ताज्या घडामोडी

महागांव! खडका फाटा येथे मराठा आरक्षण साखळी उपोषण सुरू.

महागांव! खडका फाटा येथे मराठा आरक्षण साखळी उपोषण सुरू.

महागाव प्रतिनिधी -मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून महागाव तालुक्यातील खडका फाटा येथे खडका, लेवा ,वाघणाथ येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील. महाराष्ट्र सरकारने जास्त वेळ न लावता लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा तोडगा काढावा . या उपोषण स्थळी विजयराव देशमुख, दत्तराव कदम, अरुणराव देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ.संदीप शिंदे, रामप्रसाद शिंदे, चंद्रकांत देशमुख, अरविंद देशमुख ,प्रसाद देशमुख, आदित्य देशमुख, विलास देशमुख माधवराव देशमुख, कैलासराव शिंदे, बापूराव शिंदे ,महेश सुरोशे, दीपक कनवाळे, हरी देशमुख, कृष्णा देशमुख, बळवंतराव चवरे, सुर्यकांत देशमुख, रुपेश कार्लेकर, अमरदीप खंदारे, अभिनंदन भोयर, रामदास ठाकरे, दशरथ मारटकर, प्रकाश जमदाडे, किसनराव देशमुख, आनंदराव देशमुख, पंजाब देशमुख, तुषार देशमुख, शंकरराव देशमुख, संतोषराव देशमुख, यतिन पुरोहित तथा सर्व सकल मराठा समाज बांधव उपस्थित आहेत.

महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *