ताज्या घडामोडी

अनुसूचित जातीमधे उपवर्गीकरण करू नये यासाठी फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वा ची मागणी उपविभागीय अधिकारीकाऱ्यांना निवेदन.

अनुसूचित जातीमधे उपवर्गीकरण करू नये यासाठी फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वा ची मागणी उपविभागीय अधिकारीकाऱ्यांना निवेदन.

 

 

उमरखेड ता/प्र मिलिंद चिकाटे : “कष्ट केलेत भीमाने माझ्या जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला जाण त्याची असू दया रे ” या ओळी प्रमाणे जाती जातीत विभागणी होऊ नये सारा समाज जोडला जावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून अनुसूचित जातीमधे उपवर्गीकरण करू नये यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्व समिती उमरखेड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.उपवर्गीकरण करणे हा राज्य शासनाच्या अधिकारात नसुन संविधानातील अनुच्छेद 3४१ नुसार संसद व राष्ट्रपती यांना असते त्यामुळे अनु.जातीतील लोकांमध्ये संघर्ष निर्माण होइल आणि sc तील ५९ जाती जातीत भांडणे लागून कलह निर्माण होईल व याचा फायदा जातीय वाद्यांना होईल . अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सरकार गंभीर नाही, सरकारच्या हेतूबद्दल आम्हाला संशय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय घाईघाईत घेतल्यास सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हा शासनाने या निणर्या चा फेर विचार करून मागासवर्गीयाच्या रिक्त असणाऱ्या जागा भरून त्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यात याव्यात अश्या मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्फत निवेदन देतांना तहसीलदार राजेंद्र सुरडकर उपस्थीत होते . प्रबोधन पर्वाचे मुख्य अयोजक प्रा.डॉ. अनिल काळबांडे, अध्यक्ष संतोष निथळे,प्रा. राजाभाऊ धांडे, प्रा.डॉ . प्रदिप ईंगोले, सचिव राहूल काळबांडे, उत्तम शिंगणकर, सारनाथ रोकडे, प्रमोद नेवरे, पि.री.पा.ता.अध्यक्ष अशोक नवसागरे, छपरबंद संघटनेचे अध्यक्ष डॉ. आयुब पठाण, भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष पांडूरंग धुळे प्रा. गजानन दामोधर, व तालुक्यातील ईतर सामाजिकि संघटनेचेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *