करंजी येथील जि.प.षाळेतील विदयाथ्र्यांनी केले सामुहिक ग्रंथ वाचन.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराश्ट्राचा उपक्रम.
ढाणकी – प्रतिनिधी ज्ञान वृध्दीगत करण्यासाठी जिवनात ग्रंथांची भुमीका महत्वाची असते.गं्रथ वाचनामुळे जिवनाची जडण-घडण होते.देषातील थोर पुरूशांच्या आत्मचरीत्रातुन संघर्शाची षिकवन मिळते.त्यामुळे विदयाथ्र्यांसाठी ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहे.असे प्रतिपादन जि.प.षाळेचे मुख्याध्यापक रविचंद्र काटोले यांनी केले.
स्थानिक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रामीण वाचनालयाकडून आयोजीत वाचन संकल्प महाराश्ट्राचा या उपक्रमाचे उदघाटन प्रसंगी 1 जानेवारी 2025 रोजी षाळेच्या प्रांगणात विदयाथ्र्यांचे सामुहिक ग्रंथ वाचन सुरू करविण्यापूर्वी उदघाटक करत ते बोलत होते.
विदयमान परिस्थीतीत पुस्तकांकडे लोकांचा कल कमी होत आहे.अषाही परिस्थतीत काही वाचनालय आपल्या सामाजिक कार्याची तळमळ म्हणून वाचन संस्कृती जिवंत ठेवत आहे त्याचाच एक भाग म्हणून हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.षासनाची ग्रंथालयाकडे बघण्याची दृश्टीसुध्दा बदलावी.त्यासाठी अनेक वाचनालयाचे अनुदान वृध्दी होणे गरजेचे आहे.जेणे करून सामाजीक संस्थांना उर्जा मिळेल.
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरूणांच्या व्यक्तीमत्वाने भरण पोशण होण्यास तसेच सार्वजनिक प्रबोधन होण्यास मदत होते.परंतु अलीकडच्या काळात देषाचा तरून वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला आढळून येत आहे.त्यामुळे तरूण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्शीत करण्याची आवष्यकता आहे.त्या दृश्टिने उच्च व तंत्रषिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील षासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन संकल्प महाराश्ट्राचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्याचे निर्देष सार्वजनीक वाचनालयाला प्राप्त झाल्याने त्या अनुशंगाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाला षाळेतील श्री.राठोड सर,श्री.धुळे सर,श्री.घुगे सर,श्री.मोरे सर,श्री.चिलकेवाड सर,गावातील सामाजीक कार्यकर्ते साहेबराव घुगरे,प्रषांत षिणकरे,अनिकेत घुगरे,मसाजी भालेराव ,कपील घुगरे,लक्ष्मण घुगरे,प्रल्हाद घुगरे,परमेष्वर सोळंके,विठठल सोळंके,पुणेष्वर देवकते,इ.वाचक वर्ग उपस्थित होता.
पहिल्या दिवषी वाचनास सुरूवात केलेल्या पुस्तकांचे आगामी 15 दिवसात वाचन पुर्ण करण्याचे लक्ष विदयाथ्र्यांना देण्यात आले.त्याषिवाय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचनालयाच्या कार्यालयामध्ये वाचन कौषल्य कार्यषाळा होणार आहे.स्थानिक लेखकांना आमंत्रीत करून विदयार्थी ,वाचक,लेखक,यांच्यात संवाद साधला जाईल.त्याषिवाय पुस्तक परिक्षण ,पुस्तक कथन स्पर्धा घेण्यात येणार आहे.सर्व वाचकांना संस्थेच्या वतिने प्रमाणपत्राचे वाटप स्पर्धकांना देण्यात येणार आहे.





