ताज्या घडामोडी

उमरखेड / जिल्हा परिषद शाळा वसंत नगर पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत.

उमरखेड / जिल्हा परिषद शाळा वसंत नगर पोफाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती गठीत.

 

विशेष प्रतिनिधी उमरखेड.

 

दि.06-01-2023रोजी जिल्हा परिषद शाळा वसंत नगर येथे झालेल्या सर्व नवनिर्वाचित अकरा सदस्य समितीच्या मीटिंगमध्ये माननीय श्री जामगे सर मुख्याध्यापक व कल्याणकर मॅडम यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली.अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये महिला सदस्यांच्या सहभाग व त्यांची भूमिका फार महत्त्वाची ठरली. अध्यक्षपदी श्री सुहास निवृत्ती खंदारे यांची निवड झाली उपाध्यक्षपदी सौ दिपालीताई संदीप आंबेकर यांची निवड करण्यात आली. तर समितीचे सर्व नव निर्वाचित सौ ज्योतीताई खंदारे,सौ लक्ष्मीबाई बोंबले, सौ जयश्रीताई घाडगे, सौ रंजनाताई शिंदे, श्री आशिष जाधव, श्री संतोष शिंदे, श्री संजय चिंचोलकर, व श्री विष्णू गायकवाड यांच्या उपस्थितीत निवडणूक झाली. यावेळी अध्यक्ष श्री सुहास खंदारे यांनी आपल्या निवडीचे श्रेय माननीय श्री बाळासाहेब खंदारे पोलीस पाटील वसंत नगर व श्री निकेश भाऊ घाडगे ग्रामपंचायत सदस्य पोफाळी श्री प्रकाश बर्डे श्री शिवाजी वाकडे श्री दीपक सावते व श्री दीपक नागमोते व माजी शाळा समिती उपाध्यक्ष विनोद भाऊ शिंदे यांना दिले आहे.यावेळी विद्यार्थ्यांचा विकास व शारीरिक व बौद्धिक खेळ व अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे अशी भूमिका अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी मांडली मांडून ही मीटिंग समाप्त केली.

About The Author