ताज्या घडामोडी

हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नामफलक तात्काळ पुन्हा लावा; रेल्वे प्रशासनाला निवेदन.

 

हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नामफलक तात्काळ पुन्हा लावा; रेल्वे प्रशासनाला निवेदन.

 

नांदेड प्रतिनिधी एस. के. चांद

 

हिमायतनगर रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांसोबतच लावण्यात आलेला उर्दू भाषेतील नामफलक (स्टेशन बोर्ड) काही दिवसांपूर्वी अचानक हटवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा उर्दू नामफलक तात्काळ पूर्ववत लावण्यात यावा, यामागणीसाठी हिमायतनगर येथील जागरूक नागरिक आणि रेल्वेचे नियमित प्रवासी शेख अफरोज अ. गणि यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मध्य रेल्वेच्या (SCR) नांदेड विभागाचे रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांना एक औपचारिक निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, रेल्वे प्रशासनाने हा बोर्ड हटवणे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २९ (१) अन्वये मिळालेल्या भाषा, लिपी आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. याशिवाय निवेदनात खालील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.१ उर्दू ही भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक असल्याने तिचा सार्वजनिक वापर पूर्णपणे कायदेशीर आहे.२ रेल्वेच्या साइन बोर्ड धोरणानुसार, प्रादेशिक भाषा, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त जन सुविधेसाठी इतर भाषांचा वापर केला जाऊ शकतो. जुन्या नांदेड जिल्ह्याचा विचार करता, या नियमाच्या आधारे येथे उर्दूबोर्ड असणे अनिवार्य ठरते.

 

३ माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे की (भाषा हा धर्म नाही). त्यामुळे उर्दू बोर्ड लावणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध आहे.या निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की, लोकहित आणि प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून हिमायतनगर रेल्वे स्टेशनवर उत्कृष्ट गुणवत्तेचा उर्दू नामफलक ३० दिवसांच्या आत पुन्हास्थापित करण्यात यावा आणि केलेल्या कारवाईची लेखी माहिती अर्जदाराला देण्यात यावी. यानिवेदनाच्या प्रती हिमायतनगर रेल्वे स्टेशन मास्तर, सीपीआरओ ऑफिस आणि नवी दिल्ली येथील रेल्वेबोर्डालाही पाठवण्यात आल्या आहेत.हे निवेदन सादर करते वेळी आणि या मागणीला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील प्रमुख नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अब्दुल अज़ीज़,डॉक्टर ज़हुर,अफरोज भाई वीरसनिकर,अरशान पठान,शेख ज़ाकिर,हुज़ेफा खतिब यांच्यासह स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे प्रशासन आता यावर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण परिसराचेलक्ष लागले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *