ताज्या घडामोडी

मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांचे ढानकी येथील मुस्लिम बांधवांनी केले स्वागत! दिला सामाजिक सलोख्याचा संदेश.

मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांचे ढानकी येथील मुस्लिम बांधवांनी केले स्वागत! दिला सामाजिक सलोख्याचा संदेश.

 

प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे.

संपुर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत चर्चिल्या जाणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण.ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पावसाची तमा न बाळगता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई मध्ये दाखल होत आहेत.

 

या आंदोलनाचा भाग होण्यासाठी उमरखेड तालुक्याच्या सावळेश्वर येथील मराठा बांधव हे मुंबई कडे रवाना होत असताना ढानकी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे समोर अभिवादनासाठी एकत्र जमले होते.यावेळी राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा चे तालुकाध्यक्ष शेख जब्बारभाई यांच्या नेतृत्वात सय्यद अतिक,हाफीज जब्बारसाहब,मुनव्वर भाई,यांच्यासह दिलीप कलाले,अमोल पाटील,दिनेश पाटील रावते,प्रकाश कांबळे,मिलिंद चिकाटे,यांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले.

 

यावेळी मराठा व मुस्लिम बांधवांद्वारे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करून,”मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या सर्व संविधानिक मागण्याना आम्हा मुस्लिम बांधवांचे पुर्ण समर्थन असुन आम्ही मनोज दादांच्या सोबत आहोत.”

अशी प्रतिक्रिया शेख जब्बार यांनी दिली.

 

यावेळी दिनेश पाटील रावते,

प्रेम रावते,दिगंबर कदम,पांडुरंग रावते,संतोष देवसरकर,प्रवीण रावते,कोंडबा रावते, अविनाश कदम यांसह मुंबईला जाणारे मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांनी मुस्लिम बांधवांसह स्वागत करून दिलेल्या सामाजिक धार्मिक सलोख्याच्या ह्या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.संविधानाला अपेक्षित असणारी समताधिष्ठितीत समाजव्यवस्था दृढ होण्यास असे प्रसंग निश्चितच पूरक ठरतील.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *