ताज्या घडामोडी

ढाणकी बसस्थानकावर एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

ढाणकी बसस्थानकावर एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

​ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ७८ वा वर्धापन दिन ढाणकी बसस्थानकावर मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवाशांचे स्वागत आणि विविध प्रबोधनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

​कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे अध्यक्ष हिरासिंह चव्हाण, कार्याध्यक्ष नाथा पाटील सचिव शेख इरफान गुलाब प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी एसटीच्या सर्वांगीण विकासावर प्रकाश टाकला, तसेच शासनातर्फे प्रवाशांना मिळणाऱ्या विविध सवलतींची माहिती दिली. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद जपत नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

​कार्यक्रमाचे औचित्य साधून ढाणकी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सुदीप देवरकर यांनी बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांशी हितगूज साधले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. प्रवास करताना सुट्या पैशांचा वापर करून वाहकांना सहकार्य करावे, या महत्त्वाच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा झाली.

 

​या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक सुदीप देवरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सफाई कर्मचारी प्रदीप गायकवाड यांनी केले. या सोहळ्याला अमोल घुंगरे, कोबा करेवाड, गजानन हानवते, गोलू घुंगरे यांच्यासह अनेक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रवाशांना पेढे वाटून सांगता करण्यात आली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *