अप्पर पोलीस आधीक्षक अशोक थोरात यांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी.
ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे
पोलीस विभागा ने मागील वर्षी आलेल्या अनुभवातून यावर्षी चालू असलेल्या गणपती उत्सव दरम्यान कोणतीही चूक होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जात आहे.
ढाणकी नगरीत कधी नव्हे ते पोलीस बंदोबस्त या वर्षीच्या गणेश उत्सवा निमित्त पाहण्यास मिळत आहे.बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी महावितरण, महसूल, नगरपंचायत यांना घेऊन मिरवणूक मार्गाची पाहणी केली त्यांनतर ढाणकी पोलीस चौकी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गावातील गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, राजकीय पक्ष यांची गणेश स्थापना पूर्वी बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
गणेश स्थापना मिरवणूक दिवशी स्थनिक गुन्हे शाखेची टीम सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी हजेरी लावून गणपती स्थापने पर्यंत मिरवणूकवर लक्ष ठेऊन होत.
आज अप्पर पोलीस आधीक्षक अशोक थोरात यांनी ढाणकी नगरींतील मिरवणूक मार्गाची पाहणी करून ठाणेदार यांना गणेश उस्तव शांततेत पार पाडण्या करिता सर्व प्रकारच्या प्रति्बंधक उपाययोजना करणे बाबत सूचना केल्या. मिरवणूक मार्गातील गणपती मंडळाच्या सदस्य यांच्याशी चर्चा केली.उत्सवा दरम्यान पोलीस विभागाकडून कोणतीही लपरवाही नको म्हणून संपूर्ण ढाणकी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त दिसून पडत आहे.




