ताज्या घडामोडी

ढानकी, टेंभेश्वरनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी!

ढानकी, टेंभेश्वरनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी!

 

प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांतून आजघडीला सामाजिक क्रांती करायला हवी.”

असे प्रतिपादन बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी केले.ते ढानकी येथील टेंभेश्वर नगर येथे लहुजी क्रांती मोर्चा द्वारे आयोजित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख जहीर भाई यांनी महापुरुषांचा विचारच समाजाला तरणार आहे. असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारत मुक्ती मोर्चा चे विद्वाभाऊ केवटे,प्रकाश कांबळे,शेख जब्बार भाई हे होते.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा चे मल्हारी दवने,मिलिंद चिकाटे,प्रकाश कांबळे, सैय्यद अतिक भाई,राजू हणवते, डॉ.सोनाळे,पडवळे यांसह मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख जहीर भाई यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे अनावरण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

 

यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लहुजी क्रांती मोर्चा टेंभेश्वर नगर शाखेचे दिलीप कलाले,मनोहर पडोळे, संदीप कदम, सौरभ काळे, अभिषेक काळे,शुभम कलाले,राजू लामटीळे,माधव जळके,गजानन लामटीळे,सुदर्शन सासाने,नामदेव पडोळे,संतोष दर्शनावाड,गीतेश्वर कलाले,देविदास कलाले, भगवान लामटिळे, दत्ता झिंझाडे, शादुलभाई ठेकेदार,

यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी लहुजी क्रांती मोर्चा महिला आघाडी युवा आघाडीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *