ताज्या घडामोडी

ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी व शाळा व्यवस्थापन समितीची निवड 

ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी व शाळा व्यवस्थापन समितीची निवड

 

ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

 

ढाणकी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाउराव पाईकराव होते.

याप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा दिला. १८४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा काढून त्यांनी अज्ञान व अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला, ज्यामुळे आज स्त्रिया सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यावेळी

कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती बलाळ[गोपेवाड], भावना भुजाडे,शाहीन हमीद सय्यद, सुनिता लुटे, पुष्पा कल्यानकर, देवसिग पडवाके, सुशील पवार संर नगरसेविका सारिका कांबळे इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पवार संर यांनी केले,यावेळी ज्योती बलाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत स्ञी शिक्षणातील य्यांच्या योगदानाचे महत्त्व दिले व तसेच शाळा व्यवस्थापन समितीची नवि कार्यकारिणी निवडण्यात आली, यावेळी नवनिर्वाचित समितीचा पदग्रहण सोहळा पार पडला,व शाळा समितीच्या अध्यक्षपदी संदीप भाउराव पाईकराव यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी श्रीमंती दर्शना विठ्ठल यायकोडे यांची निवड करण्यात आली आहे, समिती सदस्य म्हणून साहेबराव गायकवाड, शेख अफरोज, सचिन आरेवाड, मनीषा पाईकराव, सीमा पराते, रूपेश शिदे, हर्षादा नलावाडे, कांचन गुंडेवार, सीमा परविन, चंद्रमणी पाईकराव, यांची निवड करण्यात आली, शिक्षण तज्ञ म्हणून विठ्ठल वायकोडे यांची निवड करण्यात आली, समारोपप्रसंगी नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जुन्या समितीचा सत्कार करून य्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *