ताज्या घडामोडी

घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान.

घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर

पंतप्रधानमंत्री आवास योजने, ग्रामीणचे माहूर तालुक्याला 2024- 25. या वर्षाकरिता 5946 घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 5854 घरकुलाला मंजुरी मिळाली.असून त्यांचा निधी पंचायत समितीला जमा झाला आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभधारकांनी बांधकाम तातडीने पूर्ण करावे.असे आवाहन पंचायत समिती माहूर चे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण)अंतर्गत माहूर तालुक्या करिता मंजुरी मिळालेल्या 5854 पैकी,केवळ (19) घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या 5184 लाभधारकांना पहिला, 901 दुसरा, 210

लाभार्थ्यांना तिसरा, व तीन लाभार्थ्यांना चौथ्या,हप्त्याचा निधी वितरण करण्यात आला आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च्या घरकुल लाभार्थ्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही. जस-जसे बांधकाम केले जाईल, तसतसे त्यांना निधीचे वितरण करण्यात येईल.असे आश्वासन ही यावेळी गट विकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी दिले आहे. त्यामुळे घरकुलधारक ही मोठ्या उत्साहाने आपल्या घरकुलाचे काम तातडीने करत असल्याचे सुद्धा चित्र दिसत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *