ताज्या घडामोडी

घाटंजी / स्त्री शिक्षणाची प्रेरणा जयंती उत्सव ३ जानेवारी रोजी जरंग गावात उत्साहात साजरी.

घाटंजी / स्त्री शिक्षणाची प्रेरणा जयंती उत्सव ३ जानेवारी रोजी जरंग गावात उत्साहात साजरी.

 

 

(ता. घाटंजी जि. यवतमाळ) :

महान समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक ३ जानेवारी रोजी जरंग गावात उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षकांपैकी होत्या आणि स्त्री शिक्षण, विधवा व बालविवाहांविरोधी कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यामुळे आजही समाज सुधारणा आणि स्त्री शिक्षण प्रेरणादायी ठरते.

या कार्यक्रमास पोलीस पाटील रेखाताई प्रभाकर चौधरी, रिलायन्स फाउंडेशनचे राहुल ढवस साहेब, FES संस्थेच्या करिष्मा आडे मॅडम उपस्थित होत्या. श्री. नितेश मोहुर्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वरित दत्ता लेनगुरे, भाविक गोकुळ मोहुर्ले, गुनश्री नागोराव मोहुर्ले या चिमुकल्याणी सावित्रीआई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत भाषणे व कविता सादर केली.

हा कार्यक्रम दत्ता चाटाळे, अंकुश लेनगुरे, अविनाश लेनगुरे यांच्या सहकार्याने पार पडला, तर वैभव सोनटक्के , निलेश चौधरी, अंकुश मोहुर्ले, अनिकेत कनाके व भोजराज लेनगुरे यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सावित्री आई व ज्योतिराव फुले यांच्या जयघोषाने उत्साहात सांगता केली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *