ताज्या घडामोडी

सोनदाभी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

सोनदाभी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

ढाणकी (प्रतिनिधी): सोनदाभी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती लुटे होते.

याप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा दिला. १८४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा काढून त्यांनी अज्ञान व अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला, ज्यामुळे आज स्त्रिया सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. यावेळी इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी अक्षदा वाडेकर हिने सावित्रीबाईंची वेशभूषा साकारली होती.

कार्यक्रमाला पोलीस पाटील सिताराम रबडे, उपसरपंच मारोती पिलवंड, देवानंद वाडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश राठोड यांनी केले, तर आभार अक्षय नवरे यांनी मानले. मुख्याध्यापक गायकवाड व चव्हाण सर यांनीही मार्गदर्शन केले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *