राजकारण

ढाणकी येथे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णालयास मंजुरी प्रदान करा.- शिवसेना (शिंदे).

ढाणकी येथे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णालयास मंजुरी प्रदान करा.- शिवसेना (शिंदे).

ढाणकी/प्रतिनीधी : मिलिंद चिकाटे

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांचे पत्र क्रमांक ९०२३-२४/२४ दिनांक २८-०६-२०२४ रोजीचे पत्र तसेच उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला २८४५० – ५३ दि. २८ – ६ – २०२४ यांचे वरील विषयासंदर्भात पत्र सहसंचालक आरोग्य सेवा,रुग्णालये(राज्यस्तर) मुंबई येथील कार्यालयास प्राप्त झाले असुन, पुढील कार्यवाहीस्तव मौजा ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मध्ये रूपांतर लवकरात लवकर करावे याकरीता शिवसेना (शिंदे) ढाणकी तर्फे जिल्हा शल्यचिकित्सक यवतमाळ मार्फत सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये राज्यस्तर मुंबई यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना सुद्धा,ढाणकी व परिसराची मागणी पाहता याप्रकरणी गांभीर्याने लवकरात लवकर लक्ष घालून काम पूर्ण करावे अशी मागणी शिवसेना (शिंदे) तर्फे निवेदनातून करण्यात आली.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे, शिवसेना ढाणकी शहर प्रमुख संजय सल्लेवाड, सुनील मांजरे, शेख इरफान व सुरेश जाधव हे उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *