ताज्या घडामोडी

यवतमाळ आर्णी -बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल, हज यात्रेकरूंचा सत्कार व शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

 

 

आर्णी : बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल, आर्णी येथे हज यात्रेकरूंचा इस्तकबाल व सत्कार तसेच जावेदउल्ला खान सर आणि जफर खान सर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्हाज सय्यद मकसूद अली पटेल सर, अध्यक्ष, आयडियल एज्युकेशन सोसायटी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भाई अमन उपस्थित होते.

 

कार्यक्रमास हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल, धानकी येथील शिक्षक व कर्मचारी, बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल, आर्णी तसेच उर्दू हायस्कूल, पोबारा लेआउट, यवतमाळ येथील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख पाहुणे भाई अमन यांनी आर्णी शहरातील सर्व उलेमांना हज यात्रेसाठी पाठविण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजीब अहमद सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुजफ्फर हुसेन नादीम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

TV9 माझा लाईव्ह न्यूज साठी — पी. आय. खान, उमरखेड.

About The Author

Leave a Reply