अवैध उत्खननाविरोधात पत्रकारांचा एल्गार! ३० सप्टेंबरला तहसीलसमोर आमरण उपोषण.
महागाव तालुक्यातील कथित अवैध उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे! जनुना, भांब, वेणी, डोंगरगाव, सेवानगर, करंजखेड, मुडाणा-उटी आणि भोसा परिसरातील ई-क्लास जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचा आरोप पत्रकारांच्या निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रकरणांची चौकशी करून उत्खननाची वसुली, दंडात्मक कारवाई आणि शेतकऱ्यांचे पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांवर ठोस कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबर २०२६ पासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
👉 आता महसूल प्रशासन कारवाईचा हातोडा चालवणार, की उपोषणाची वेळ येणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे!




