टेंभेश्वरनगर येथील नागरिकांची घरे त्यांच्या नावावर करा.
[पालकमंत्री संजय राठोड यांना शिवसेना (शिंदे) ढाणकी तर्फे निवेदन.]
ढाणकी/ प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे./ढाणकी येथील टेंभेश्वरनगर येथील जवळपास ४०० ते ५०० कुटुंब हे बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास असून, केवळ त्यांच्या राहत्या जागेवर शासन शब्द असल्या कारणामुळे, त्यांना कोणतीही शासकीय सुविधा, शासकीय सुविधेचा लाभ भेटत नाही. तिथे राहणारे कुटुंब हे अत्यंत गोरगरीब, प्रतिकूल परिस्थितीचे असून, त्यांना अतिक्रमण मुक्त करून नियमानुकूल करण्यात यावे. याकरिता आम्ही पत्रव्यवहार केला होता. त्यावर नगररचना विभागाने ढाणकी नगरपंचायत ला त्रुटी दूर करण्याचे पत्र पाठवले होते. तद्नंतर नगरपंचायतने त्या त्रुटी दूर करून अहवाल सादर केला होता. शासन निर्णय क्रमांक 2019/ प्र.क्र. 15/ नवी- 26, दि. 6 मार्च 2019 नुसार, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत, शासन निर्णयानुसार समितीचा ठराव घेण्याकरिता कळविले असून, त्या अनुषंगाने सभेची मंजुरी यासोबत ठराव तयार करून नगरपंचायतने पाठविला असून, सदर ठरावास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लवकरात लवकर मान्यता प्रदान करण्यात यावी याकरिता, शिवसेना ढाणकी शहर तर्फे पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे ,ढाणकी शहर प्रमुख संजय सलेवाड ,सुनील मांजरे, शेख इरफान व सुरेश जाधव हे उपस्थित होते.
टेंभेश्वरनगर येथील रहिवाशांचे त्यांचे हक्काचे घर लवकरच त्यांच्या नावे होणार असून, पालकमंत्री महोदयांनी स्वतः गांभीर्याने हा विषय लावून धरला असून, शिवसेना शिंदे गट ढाणकी जोपर्यंत टेंभेश्वरनगर रहिवाशांचे घर त्यांच्या नावे होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करीत आहोत.संजय सलेवाड
शिवसेना शहर प्रमुख ढाणकी.




