गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून वाळू चोरी कोणाच्या आशीर्वादाने ?सुराेशे मंडळ अधिकारी यांची पुन्हा कार्यवाही
ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.
उमरखेड तालुक्यातील गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून दिवस रात्र मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी जोमात चालते . यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी व पोलीस प्रशासन या सर्वांची असते,मात्र महसूल विभागाची नाक फक्त सुराेशे मंडळअधिकारी वाचवत आहे. पण एकटा अधिकारी हा पूर्ण वाळू माफिया चा नायनाट तर करणार नाही ना?
वाळूच्या अवैध वाहतूक, होत असताना मग यात आपल्या कर्तव्यात कोण कसूर करत आहे हे तरी तपासले जाणार आहे का ?वाळू उपशावर बंदी असूनही गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून चोरट्या पध्दतीने वाळूउपसा आणि वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू रोखण्याच्या नावाखाली महसूल व पोलीस विभागाकडून हप्तेखोरी होऊ लागल्याची चर्चा नागरिकांत आहे.
विशेष म्हणजे वाळू चोरट्यानी आपले हप्ते बांधले असून वाळू चोरी सोईस्कर होण्यासाठी पिकअप गाडीचा वापर करत असल्याची माहिती आहे. तसेच बेल बंडी धारकांना टार्गेट करून कार्यवाई करून हप्ते बांधल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे ज्यांच्याकडून हप्ते मिळत नाही. अश्या वाहन धारकांना आणि बेल बंडी धारकांना टार्गेट करून कार्यवाई केली जात असल्याची गावात चर्चा आहे. मात्र मोठ्या वाळू चोरांवर अध्याप कार्यवाई सुन्यच आहे. विशेष ढाणकी गावातून रोज अवैध वाळूचे पिकअप आणि ट्रकटर चालतात. या कामात गाडवावरून नदी पात्रातून वाळू काढल्या जात आहे . पत्रकाराना या बाबत सविस्तर माहिती मिळते. मात्र जनतेच्या सेवेत रुजू असलेले अधिकारी कर्मचारी यांना ही माहिती मिळत नाही का ? हे आश्चर्य मानले जाते. म्हणजेच तालुक्यातील गांजेगाव पैनगंगा नदी पात्रातून कोणाच्या आशीर्वादाने वाळू चालू आहे हे शोध घेण्याचा विषय असून यात उमरखेड चे कर्तबगार तहसीलदार साहेबांनी सुराेशे मंडळअधिकारी सारखे जास्ती जास्त अधिकारी नेमून या वाळू माफियावर अळा घालावा अशी जनतेतून मागणी होत आहे .
चौकट :
आज ही गजानन सुरोशे आपले कर्तव्य प्रामाणिक पणे करत असतानी त्यांनी,आज दि २९/१२/२०२४ राेजी सकाळी ३:३० वा माैजे कंरजी येथून विना परवाना रेतीचे उत्खनन व वाहतुक करनारे वाहन तहसिल कार्यालय परीसरात लावन्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत गजानन सुराेशे मंडळअधिकारी,पंजाब सानप,अक्षय शिंदे ,अनिकेत शिरसाट ग्राम महसुल अधिकारी,कल्यान साेळंके,वासुदेव ज्युकाेटंवार ग्राम महसुल सेवक व धम्मपाल कांबळे चालक व पाेलिस कर्मचारी होते