ताज्या घडामोडी

उमरखेड /उन्हाळ्यात पाण्याची समस्या बघता उन्हाळा लागण्या आधी नगर सेवकांनी केले हात पम्प दुरुस्त 

उमरखेड /उन्हाळ्यात पाण्याची समस्या बघता उन्हाळा लागण्या आधी नगर सेवकांनी केले हात पम्प दुरुस्त

 

ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे

 

उमरखेड तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेले नगरपंचायत असलेले ढाणकी हे गाव असून मागील कित्येक वर्षापासून येथील पाण्याची समस्या सोडवलेली नाही. त्यामुळे आता ही हिवाळ्यात ढाणकी करांना आठ ते पंधरा दिवस आड करून पाणी मिळतो. त्यामुळे पिण्यासाठी व सांडपाण्यासाठी येथील नागरिकांना विकतचा पाणी घ्यावे लागते . तर गरीब मध्यम वर्गाला गाव बाहेरून शेतातील पाणी आणावे लागते .ढाणकी नागरिकांन साठी अद्याप ही खासदार व आमदार यांनी पाण्यासाठी काहीही उपाय योजना केली नाही आहे. पण यालाच अपवाद प्रभाग सतरा चे नगर सेवक संतोष पुरी यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांने उन्हाळ्यात पाण्यासाठी फिरू नये म्हणून मागील दोन वर्ष बंद असलेला हात पम्प दुरुस्त केला असल्यामुळे प्रभागतील नागरिकांची थोडीफार तरी पाण्याची समस्या मिटणार आहे.

About The Author