ताज्या घडामोडी

उमरखेड /वाचन संकल्प .संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे आयोजन,

उमरखेड /वाचन संकल्प .संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे आयोजन,

 

प्रतिनिधी,ढाणकी, मिलिंद चिकाटे

वाचन संकल्प महाराष्ट्राचा संस्कार सौरभ वाचनालयामध्ये साजरा ,

 

वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु सध्या तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत असून मोबाईलच्या आहारी जात आहेत यामुळे वाचनाकडे तरुणांचं दुर्लक्ष होत आहे या तरुण पिढीवर ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात दिनांक एक जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्याबाबत निर्णय झाला आहे सदर उपक्रमांतर्गत स्वच्छता सामूहिक वाचन ,वाचन संवाद, वाचन कौशल्य ,पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यासारखे उपक्रम राबविण्यासाठी ची माहिती शासनाकडून आली आहे त्यामुळे संस्कार सौरभ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत रावते साहेब यांनी वरील उपक्रम साजरे करण्याचे आवाहन सर्व वाचनालयाचेपदाधिकारी स्पर्धा वाचक विद्यार्थी, परिसरातील शाळेतील मुख्याध्यापक यांना केले आहे .वाचनालयाच्या परिसरात दिनांक 29 12 24 ला परिसर स्वच्छता करून उपक्रम सुरू केले. दिनांक 30 12 24 ला व 31 12 24 ला ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले .वाचन कौशल्य, वाचन संवाद या उपक्रमाचे नियोजन देखील केले आहे या उपक्रमाचा लाभ परिसरातील विद्यार्थी मुले ,मुली ,वाचक ,स्पर्धेतील विद्यार्थी, यांनी घ्यावा असे आवाहन केले आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *