महागांव / वाकान येथे मटका जुगार दारू खुलेआम सुरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.

प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर यांची रिपोर्ट
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले व महागांव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेले मौजा वाकान येथे कायदा सुव्यवस्थेची कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता भर दिवसा व रात्रीच्या सुमारास खुलेआम मटका जुगार दारू सुरु आहे याकडे पोलिस प्रशासनाने सततच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे गावातील महिला या व्यवसायिकांना कंटाळल्या असुन त्यांचे पती दिवसभर काहि कामधंदे न करता मोल मंजुरी करून आपल्या कुटुंबाचे उद्रपोषन करणाऱ्या महिलांचे पतीदेव मटका जुगार दारूच्या आहारी गेलेले आहेत त्यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहेत मटका जुगार दारू या व्यवसायिकांना कंटाळून काल दिनांक १८/०९/२०२४ रोजी काही महिला महागांव पोलिस स्टेशनवर धडकल्या होत्या मात्र कोणत्याही प्रकारची या व्यवसायीकावर कार्यवाही करण्यात आलेली नाही वाकान येथील मटका जुगार दारू कायम स्वरुपी बंद करन्याची मागणी या महिलांनी महागांव पो स्टेशन येथील ठाणेदार साहेब यांना विनंती केली आहे मटका जुगार दारू मुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असुन काही महिलाचे पती स्वर्गवासी झाले आहे वाकान येथील मटका जुगार दारू बंद न झाल्यास येणाऱ्या काळात अनेकांचे प्राण बळी गेल्या शिवाय राहणार नाही या व्यवसायीकांनी काही पोलिस कर्मचाऱ्यांना हप्ते देउन बांधले आहे त्यामुळेच वाकान येथे निडर आणि खुलेआम मटका जुगार दारू सुरु आहे याकडे पोलिस प्रशासनाने जातीने लक्ष वेधन्याची आवश्यकता असुन या मटका जुगार दारू व्यवसायीकावर दंडात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे असे वाकान येथील महिला पुरुष नागरिकांमधून बोलल्या जात आहे मां पोलिस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून वाकान येथील मटका जुगार दारू बंद करन्याची मागणी आता जोर धरत आहे




