ताज्या घडामोडी

निर्मल–हिमायतनगर–ढाणकी–उमरखेड बससेवा सुरू; प्रवाशांमध्ये आनंद.

निर्मल–हिमायतनगर–ढाणकी–उमरखेड बससेवा सुरू; प्रवाशांमध्ये आनंद.

 

ढाणकी प्रतिनिधी :

तेलंगणा, मराठवाडा आणि विदर्भ या भागांना जोडणारी महत्त्वाची निर्मल–हिमायतनगर–ढाणकी–उमरखेड बससेवा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या बससेवेचा लाभ परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.निर्मल आगारातून ही बस सकाळी 7.30 वाजता सुटणार असून उमरखेडहून परतीची बस दुपारी 12 वाजता रवाना होणार आहे. हा मार्ग कुंटला, ओला, लिंबी, पारडी (बी), तोटोबा, कोसमेट, इस्लापूर, हिमायतनगर, ढाणकी आणि उमरखेड या गावांमधून जाणार आहे.ही बससेवा सुरू करण्यासाठी माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ, ढाणकी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने निर्मल आगाराने ही सेवा सुरू केली आहे.बस ढाणकी बसस्थानकावर पोहोचताच चालक व वाहक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रक सुदीप देवरकर उपस्थित होते. तसेच प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष हिरासिंह चव्हाण, सचिव शेख इरफान शेख गुलाब, कार्याध्यक्ष नाथा पाटील, उपाध्यक्ष सौरभ मिटकरे, सदस्य शैलेश साखरे व राजेश बस्सी (सोदाबीकर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रवाशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्मल आगाराचे व्यवस्थापक राठोड, रमा आण्णा सर, तसेच सफाई कर्मचारी प्रदीप गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.तेलंगणा, मराठवाडा आणि विदर्भ या तीन प्रदेशांना जोडणारी ही बसफेरी सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत निर्मल आगार प्रशासनाचे आभार मानले आहेत. नवीन बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन दळणवळण अधिक सुलभ होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *