क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता.

उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता.

उमरखेड. शहरातील महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शनिवारी (दि. 21 रोजी मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण सोडवा, अशी मागणी करत रात्रभर मुसळधार पावसात पाण्याच्या टाकीवर भिजत आंदोलन केले.

 

मनोज पाटील जरांगे यांचे दुपारी 4 वाजतापर्यंत उपोषण सोडून घेतले नाही. तर 5 वाजता येथील पाण्याच्या टाक्यावरून आत्मदहन करण्याचा खुला इशारा 4 मराठा आंदोलकांनी दिला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

 

येथील 4 मराठा आंदोलन कर्ते हे काल दुपारी अडीचपासून पाण्याच्या टाक्यावरून आंदोलन करीत होते. आंदोलनामध्ये सचिन घाडगे, गुणवंत सूर्यवंशी, गोपाल झाडे, जयवंत सूर्यवंशी यांचा सहभाग होता.

 

आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलकांना सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी तूर्तास आपले आंदोलन स्थगित केले.

यावेळी भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वानभाऊ केवटे यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या संविधानिक मागण्यांना जाहीर समर्थन करीत आंदोलनाच्या यशस्वीतेबद्दल उपस्थित आंदोलकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी कृष्णा,कदम, अंकुश कदम, सूर्यकांत वाढवे,यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *