क्राईम डायरी

पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई.  

पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई.

 

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चीकाटे.

 

आज दिनांक दि. 23/06/2026 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बिटरगावचे अधिकारी व कर्मचारी यांनी फुलसावंगी फाटा, ढाणकी येथे सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान इसम नामे विजय जळबा कांबळे, वय 23 वर्षे, रा. हरदडा ता. उमरखेड यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक धारदार तलवार जप्त करण्यात आली.

 

सदर इसमाकडे तलवार बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना अथवा कायदेशीर अधिकार नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध Arms Act कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेले शस्त्र ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

 

सदर कारवाई बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोउपनि सागर अन्नमवार, बिट जमादार रवी गिते, मोहन चाटे, पोहेका दत्ता हिंगाडे, पोलीस शिपाई सुदर्शन जाधव, शरद चव्हाण, प्रवीण जाधव व इम्रान शेख यांनी पार पाडली.

 

सदर गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मोहन चाटे करीत आहेत.

 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाचा निर्धार असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *