प्रेस रिपोर्टर एस टी शब्बीर महागाव
महागाव शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांचा व सर्जा राजाचा पोळा सण उत्साहात साजरा महागांव शहरातील मानकऱ्यांच्या हस्ते बैल जोडी चे आरती व पूजन करण्यात आले . महागांव जुने गांव हनुमान मंदिर परिसरात महागांव शहरातुन बळी राजा यांनी बैल जोडी एकत्र हनुमान मंदिर येथे जमा होऊन सर्व बैलजोडींची मानकऱ्यांच्या हस्ते पूजा, नैवेद्य, आरती, करण्यात आली. या वेळेस महागाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष धनराज मुळे साहेबव त्यांचे पोलीस कर्मचारी उपस्तित होते तसेच गावातील संपूर्ण जेस्ट नागरिक शेतकरी बाल वर्ग यांनी बैल पोळा सणाचा आनंद घेतला . काल रविवारी ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांवर अवकळा पसरवली होती. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा बैलपोळा हा सण उत्साहात साजरा झाला .