गोविंद पेन्शनवार यांनी बडिलांच्या स्मृती पित्यर्थ मोक्षधाम समितीला 51,000 रुपये दिले.
उमरखेड प्रतिनिधी. ढाणकी येथील मोक्षधाम आज नंदनवन झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंत्यविधीला आलेला प्रत्येक व्यक्ती समशान भूमी पाहून आश्चर्य व्यक्त करतात.
मोक्षधाम मध्ये लिंब,वड,पिंपळ, आंबे,बेल यासह इतरही दोन ते तिन हजार वृक्ष मोठ्या डोलात डोलताना दिसून येतात. उन्हाळ्यात तर अंत्यविधीला आलेले व्यक्ती तासन तास झाडाच्या सावलीत बसून राहतात. अंत्यविधीला आलेल्या महिला पुरुष यांना स्वतंत्र संडास बाथरूम ची व्यवस्था.पावसापासुन अंत्यविधीला आलेल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी टिन शेड बसण्यास बाके. आंतर्गत रस्ते, नाल्या लाईट, पिण्यास स्वच्छ पाणी. महादेवाची मूर्ती, मूर्ती परिसरात बाग बगीचा. अतिशय निसर्गरम्य वातावरण. अंत्यविधीला आलेल्या व्यक्तीला वाटतच नाही की आपण अंत्यविधीला आलो.
मोक्षधाम सुधारणा मागील पंधरा वर्षा पासून सतत केली जात आहे. गावातील दानशूर आपल्या इच्छेने मोक्षधाम सुधारणा करण्या करीता वर्गणी देत असतात. अंत्यविधीला आलेला प्रत्येक व्यक्ती झोळी मध्ये पैसे टाकून मोक्षधाम सुधारण्यास मदत करतात. गावाची वाढती व्याप्ती पाहून मोक्षधाम समितीने मोक्षरथ लोकवर्गणीतून उपलब्ध केला.
सोपान पेन्शन्नवार यांचे अल्पशा आजाराने दि.23/ 6/2025 रोजी निधन झाले होते. आपल्या वडिलांच्या नावे मुलगा गोविद सोपान पेन्शनवार यांनी मोक्षधाम सुधारणेला म्हणून 51,000 रुपये दिले. यावेळी मोक्षधाम समिती आध्यक्ष सुभाष कुचेरिया, सचिव अतुल येरावार, आमोल तुपेकर, नितीन येरावार, गजानन गंजेवाड यासह इतरही सदस्य यांच्या कडे दिले.मोक्षधाम समितीने गोविंद पेन्शनवार यांचे आभार व्यक्त केले.




