क्राईम डायरी

यवतमाळ / महागांव पोलीस स्टेशनला शांतता समितीची सभा ठरली वादळी.

ब्युरो रिपोर्ट / एस.के चांद

 

येणारे गणेश उत्सव मुस्लिम बांधवांचा ईद मिलाब येणाऱ्या सणाच्या अनुषंगाने महागांव येथे शांतता समितिची सभा आज महागांव पोलिस स्टेशनच्या वतीने घेण्यात आली . यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शांतता समितीचे सदस्य पत्रकार मंडळी यांना आमंत्रित करण्यात आले होते .महागाव तालुक्यात येणारे सण गणेशोत्सव, ईद-ए-मिलाब ,दुर्गा उत्सव या अनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आले होते .अध्यक्षस्थानी नगरसेवक संभाजीदादा नरवाडे, नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ . सुनंदाताई दिलीपराव सुरोषे रामराव पाटील नरवाडे, जगदिश नरवाडे जन आंदोलन आधार संघर्ष समिती चे अध्यक्ष, दिलीप राव कोपरकर गजानन वाघमारे,विनोद कोपरकर, निलेश नरवाडे , पवन रावते , संजय कोपरकर, महागांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे साहेब तालुक्यातिल गणेश मंडळ चे अध्यक्ष, सचिव हे प्रामुख्यांने उपस्थित होते . येणारे सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पोलीस स्टेशन कडून अवाहन करण्यात आले या वेळी गणेशमुर्ती ची काळजी घेणे मिरवणुकीचा रूट, आणि , डि .जे , आवाजावर चार्चा झाली गणेश मंडळाचे याविषयी मत जानुन मार्ग काढण्याची भूमिका ठाणेदार धनराज निळे यांनी घेतली . गावतील नागरिकांनी उसात बाधा येऊ नये म्हणून काही हरकती नोंदविल्या प्रामुख्याने जगदिश नरवाडे यांनी तालुक्यातील अवैध धंद्यांवर आपले प्रखड मत व्यक्त केले अवैध व्यवसाय तालुक्यात जोराने चालू आहे . पोलीस प्रशासन बघ्याची भुमिका का घेतात त्यांनी प्रत्येक्ष अवैध धंदेवाल्यांन कडून पोलीसांचे आर्थिक हित संबंध जोपासत आहेत का? तालुक्यात मोठ्या प्रमाणानात नशेचा काळा बाजार चालतो प्रत्येक गावात दहा ते पंधरा हातभट्ट्यामुळे दारूचा महापूर प्रत्येक गावात आला , गांजा , मोठ्या प्रमाणात राजरोस पने पानटपरी पासुनत मुख्य ठिकाणी राजरोस पने विकल्या जातो गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे .बसस्थानक परिसरात वरून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे . मुलींची महिलांची सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले . या वेळी ठाणेदार धनराज निळे यांनी या सर्व बाबीची लवकरच दखल घेवुन मोठी कारवाई करू असे आश्वासन देऊन मीटिंग ची सांगता केली

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *