घाटंजी येते क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्ताने भव्य शोभयात्रा
घाटंजी प्रतिनिधी :-
घाटंजी क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या 147 वी जयंती निमित्तान 15 नोव्हेंबर 2022 रोजी घाटंजी शहरात बिरसामुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले . क्रांतीसुर्य बिरसामुंडा हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक असुन आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहे. अशा महामानवाच्या जयंती निमित्त घाटंजी तालुक्यातील विविध आदिवासी संघटनाच्या वतीने शहरातुन पारंपारिक लोकनृत्य व वाद्या सह भव्य शोभयात्रेचे आयोजन केले. मिरवणूकीला समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वप्रथम बिरसामुंडा चौक घाटी येथे पुजन व समाज प्रबोधन करण्यात आले यात मान्यवरांनी बिरसामुंडा यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.नंतर पारंपरिक लोकनृत्य व वाद्या सह शहरातील मुख्य ठिकाणांवरुन फिरत शेवटी शिवाजी चौकात शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेचे आयोजन आँल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी जेष्ठ नागरिक संघटना, अखिल भारतीय परधान समाज संघटना, आँल इंडिया आदिवासी पिपल्स फेडरेशन,आदिवासी विद्यार्थी परिषद, जय जंगो जय लिंगो महिला विकास संस्था, बिरसा ब्रिगेड ,आंध समाज संघटना, शामादादा कोलाम समाज संघटन तसेच घट्या महाजन कारभारी भुमक कमेटी याच्या वतीने करण्यात आले होते.