राजकारण

देशाच्या आर्थिक विकासात पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे योगदान महत्वाचे:-प्राचार्य डॉ. उमाकांत कोंडेवार

देशाच्या आर्थिक विकासात पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे योगदान महत्वाचे:-प्राचार्य डॉ. उमाकांत कोंडेवार

महाराष्ट्र चीफ एस के चार यांची बातमी

मुदखेड (दि.) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन निमित्ताने भारताचा ७५ वर्षां मधील आर्थिक विकास या विषयावर डॉ. उमाकांत कोंडेवार माजी प्राचार्य, दयानंद महाविद्यालय , लातूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम होते. भारताच्या आर्थिक विकासात राजीव गांधींचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. त्या काळात तंत्रज्ञानाची बीजे पेरली गेली. संघणक क्रांती घडवून आणून भारताचा आर्थिक विकास करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. रमेश कदम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये नवीन पिढीला भारताचा इतिहास सांगण्यासाठी अशा विविध व्याख्यानांचा आयोजन करण्यात आले पाहिजे. देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले पण मराठवाडा निजामाच्या तावडीत होता. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता मराठवाडा मुक्तिसंग्रामात मध्ये भाग घेतला. आणि त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याची फळे आज आपण चाखत आहोत हे अलीकडील युवावर्गाला कळाले पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. आर. बी. कोटलवार, प्रा. डॉ. राहुल धावारे होते.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर विजय सिंह ठाकूर प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. बी. कोटलवार तर आभार प्रा. डॉ. दत्ता म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *