चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार.
यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख
यवतमाळ/उमरखेड तालुक्यातील मौजे चालगणी येथील ज्या घरांचे खरोखर भिंती पडल्या व घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही परतु त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही उचांवर आहेत ज्याच्या भिंती सुद्धा पडल्या नाहीत अशा लोकांना सरपंच ,पोलीस पाटील ” तलाठी व ग्राम विकास अधिकारी यांनी संगनमत करून कोणत्याही प्रकारचे नुकसान न झालेल्या व्यक्तींची नावे नुकसान भरपाई देण्याचे अनुदान देण्याचा खोटा अहवाल शासनाकडे दिला व त्यांना अनुदान मिळाले हे मात्र विषेश चालगणी येथील रामदास थोटे ,परमानंद थोटे अंबादास वंजारे, दत्ता वंजारे ,सुधाकर थोटे, डॉ विजय थोटे, गणेश नरवाडे ,माधव काटे , गजानन चंद्रवंशी ,सुमोद दवणे ,कृष्णा वानखेडे यांनी तहशीलदार उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. चालगणी गावात पैनगंगा नदीचा पात्रात अतिवृष्टी होऊन व इसापूर धराणाचा विसर्गामुळे नदीला महापुर येऊन मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे परंतु स्थानिक सरपंच, तलाठी पोलीस पाटील व ग्रामविकास अधिकारी यांनी खोटे पंचनामे करून दिशाभूल केली आहे त्यामुळे पुन्हा पंचनामे करून गरजू व्यक्तींना लाभ देण्यात यावा तसेच 30 सप्टेंबर पर्यंत गरजूंना नुकसानीचे अनुदान न मिळाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी करून असे न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.




