ढाणकी शहर प्रतिनिधी (शेख शाहरुख) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दहावी बोर्ड चा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल ढाणकी या शाळेचे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शंभर टक्के निकाल लागेल. हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल मधील अरिबा तकदीस जहिरूद्दीन यांनी 99.20% गुण प्राप्त करून बोर्ड टॉपर प्रथम स्थान मिळविले आहे. हे कौतुकास्पद आहे.
तसेच अरिबा तकदीर ही यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर भारत सरकार द्वारा आयोजित निबंध स्पर्धेत देशातून प्रथम क्रमांक पटकावला होता त्यांना भारत सरकार कडून सिंगापुर अभ्यास दौऱ्यावर ही पाठवण्यात आले होते.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष सय्यद मकसूद अली पटेल सर, मुख्याध्यापक आबिद जमील सर, सर्व शिक्षक व आई-वडिलांना दिले.