क्राईम डायरी

बिटरगाव (बु.) मध्ये अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; पोलीस ठाण्यात निवेदन

बिटरगाव (बु.) मध्ये अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; पोलीस ठाण्यात निवेदन

 

प्रतिनिधी, ढाणकी मिलिंद चिकटे

 

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु.) येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात गावातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले. गावातील अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक व कौटुंबिक समस्या वाढत असून तात्काळ कारवाई करून हे प्रकार बंद करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावामध्ये अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. दारूच्या सेवनामुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद, आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. गावातील महिला व लहान मुलांनाही या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे

 

विशेष म्हणजे, गावातील शाळा व मंदिर परिसराच्या जवळपासही अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व भवितव्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता महिलांनी व्यक्त केली.

 

“गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी महिलांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

दरम्यान, महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध धंद्यांविरोधातील जनआक्रोश पुन्हा एकदा समोर आला असून प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

बिटरगाव येथे अवैध दारु विक्री होत आसलतर कायदेशीर कारवाई करू आणि आज पर्यंत आमच्या कारवाई सुरूच आहेत अवैध दारू विक्री बंद करू

About The Author