महसूल सेवक (कोतवाल) करणार बेमुदत धरणे आंदोलन.(चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्याच्या विरोधात महसुल मंत्री क्षेत्रामध्ये करण्यात येणार)
उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे
महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दिनांक ११सप्टेंबर २०२५ पर्यंत चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्यास १२सप्टेंबर २०२५ पासुन महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन कारण्याचा इशारा
महसूल सेवक (कोतवाल) यांनी तहसीलदार उमरखेड यांना निवेदन द्वारे दिला.
या निवेदनात महसूल सेवक यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील महसुल सेवक हा कणा असून विभागातील अत्यंत महत्वाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे उपाययोजना, शासन स्तरापासुन ते गाव पातळीवरील महत्त्वाच्या योजना तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरु असणाऱ्या महत्वाच्या योजना इत्यादींची अमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यं पोहचवण्याचे काम करतो. तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयात महसूल सेवक २४ तास शासकीय सेवा देत असून महसूल सेवक (कोतवाल) आपली जबाबदारी योग्यरिता पार पाडत असतो. परंतु शासनाने अद्यापर्यंत महसूल सेवक (कोतवाल) पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही. त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना महसूल सेवक (कोतवाल) यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे महसूल सेवक (कोतवाल) पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवक (कोतवाल) यांना इतर महसूल कर्मचाऱ्या प्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचारी यांचा वरील अन्याय दूर करावा अन्यथा सर्व महसुल सेवक टप्या टप्याने खालीलप्रमाणे बेमुदत धरणे आंदोलन करणार. यावेळी विदर्भ महसूल सेवक संघटना शाखा उमरखेड
तालुका अध्यक्ष अभिलाष गायकवाड, उपाध्यक्ष गोपाल काळबांडे, सचिव संघप्रिया वाघमारे, योगेश मारकवार ,सैयद इबादुल्ला, संतोष जाधव ,विश्वंभर भोंगाळे, दीक्षा लोमटे, शिवनंदा बोडके, छाया शेळके, वैष्णवी शिंदे, शिवकांत मोरे, चक्रधर काळे,ओमकार हिंगाडे, वाघोजी जाधव, प्रकाश काळबांडे, आनंद पैठणकर, प्रकाश ससाने,वासुदेव जूनकोटवार, कल्याण सोळंके व इतर सर्व महसूल सेवक हजर होते.




