ढाणकी / येथे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रजासत्ताक दिन साजरा.
ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे
प्राथमिक आरोग्य केंद्रात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक व आरोग्य जनजागृती उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका आणि नागरिकांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेत समाजात व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगराध्क्षा, तसेच नगरसेवकांचा सत्कार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ स्वाती मुनेश्वर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षीका अर्चनाताई कांता वासमवार यांचा सत्कार व नवनिर्वाचित नगरसेवक यांनाही शुभेच्छा दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित होते.




