ताज्या घडामोडी

लोकनेते अजितदादा पवार यांना ढाणकीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आज 29 जानेवारी दुपारी १२ पर्यंत ‘ढाणकी बंद’

लोकनेते अजितदादा पवार यांना ढाणकीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आज 29 जानेवारी दुपारी १२ पर्यंत ‘ढाणकी बंद’

 

​व्यापारी महासंघाचा निर्णय; शोकसभेला पत्रकार, नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती

​ढाणकी (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धडकताच ढाणकी शहरावर शोककळा पसरली आहे. एका कार्यक्षम आणि धडाडीच्या नेत्याला निरोप देण्यासाठी आज दुपारी ४:०० वाजता शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाने ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देत लाडक्या नेत्याला अभिवादन केले.

​सर्व स्तरांतून उमटल्या शोकसंवेदना या शोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर शहरातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादांच्या आठवणींना उजाळा दिला. “प्रशासनावरील पकड आणि शब्दाला जागणारा लोकनेता आपण गमावला आहे,” अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

​व्यापारी महासंघाकडून ‘बंद’चे आवाहन अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण व्यापारी वर्गाने दुःख व्यक्त केले आहे. ढाणकी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. येरवार यांनी शोकसभेत जाहीर केले की, “आदरणीय दादांना श्रद्धांजली म्हणून उद्या, २९ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत ढाणकी शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात येतील.” या आवाहनाला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

​दुखवट्यात शहर सहभागी दुपारी आयोजित केलेल्या या शोकसभेने संपूर्ण शहर हेलावून गेले होते. दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी सामूहिक मौन पाळले. उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने दुपारी १२ पर्यंत बंद राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *