उमरखेड आगाराची ढाणकी मार्ग ते आदिलाबाद बस चालू करा
(पालकमंत्रीला केली मागणी)
ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे
उमरखेड तालुक्यातील ढाणकी गाव हे सर्वात जास्त लोकसंख्या, व आजूबाजूला असलेल्या खेड्यामुळे सर्वात मोठा बाजारपेठ चा ठिकाण आहे. या गावाला मराठवाडा व तेलंगाणा सिमा आहे. त्यामुळे येथील लोकांना रोजगारा साठी व व्यापारीना खरेदी करण्यासाठी जवळ आहे. आदिलाबाद हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे कापसाच्या समृद्ध लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आदिलाबादला ‘व्हाइट गोल्ड सिटी’ असेही संबोधले जाते इथे मोठ मोठे जिनींग असल्यामुळे ढाणकी ते आदिलाबाद जवळच्या खेड्यातील लोक रोजगारा साठी तिकडे जात असतात. त्यामुळे उमरखेड आगाराची बस फेरी आदिलाबाद मार्ग ढाणकी उमरखेड ते टेंबूरधारा किनवट आंबाळी घाट या नित्यावर एक फेरी चालू केली तर विदर्भ मराठवाडा तेलंगाणा जोडणारा जवळचा मार्ग असल्याने वेळ कमी लागून राज्य परिवहन महामंडळाची पैशाची बचत होऊन उत्पन्न वाढेल व तसेच प्रवाशांची गैरसोय होणार नाही.आदिवासी दुर्गम भागातुन तांडे वस्ती जुळणार यामुळे ही फेरी चालु करणे आवश्यक असल्याने उमरखेड आगाराची ढाणकी मार्ग ते आदिलाबाद बस चालू करा अश्या आशयाचे निवेदन शिवसेना ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड , माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ आध्यक्ष शेख इरफान सचिव हिरासिंह चव्हाण, कार्याध्यक्ष नाथा पाटील ,यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना दिले आहे




