ताज्या घडामोडी

ढाणकीच्या विकासासाठी सर्वपक्षीय नगरसेवक सरसावले; नगराध्यक्षांच्या उपस्थितीत विविध कामांचा शुभारंभ.

ढाणकीच्या विकासासाठी सर्वपक्षीय नगरसेवक सरसावले; नगराध्यक्षांच्या उपस्थितीत विविध कामांचा शुभारंभ.

 

​शिवछत्रपतींचे स्मारक आणि सिमेंट रस्त्यांच्या कामांचे थाटात भूमिपूजन; शहराच्या कायापालटाची चिन्हे

 

 

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे

ढाणकी नगरपंचायतीची निवडणूक, सत्तास्थापना आणि विषय समित्यांच्या निवडीचा धुरळा खाली बसताच, आता प्रत्यक्ष विकासकामांना धडाक्यात सुरुवात झाली आहे. शहरात विविध प्रभागांमध्ये महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र हजेरी लावल्याने ढाणकीच्या राजकारणात ‘विकासासाठी ऐक्य’ पाहायला मिळाले.

​शहरातील टेंभेश्वरनगर (प्रभाग क्र. ७) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. येथील ‘शिवसाम्राज्य प्रतिष्ठान’तर्फे या स्मारकासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या तरुणांच्या दीर्घकालीन संघर्षाला अखेर यश आले असून, हे स्मारक शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल. स्मारकाच्या भूमिपूजनामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

​स्मारकासोबतच शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील प्रलंबित रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अशोक कुसुमवाड यांच्या घरापासून ते भास्कर पाटील चंद्रे यांच्या घरापर्यंत, तसेच दीपक चंद्रे यांच्या घरापासून ते जिजाऊ अर्बन बँक (दत्ता सुरोशे यांचे घर) पर्यंत सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामांमुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

​या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सत्ताधारी नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई सुंदरकांता वासमवार यांच्यासोबत शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), एमआयएम आणि काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. त्याच जोडीला विरोधी पक्षातील भाजप आणि अपक्ष नगरसेवकांनीही हजेरी लावली. “शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एकत्र येत असतील, तर शहराचा कायापालट नक्कीच होईल,” अशा भावना ढाणकीकरांनी व्यक्त केल्या.

​या सोहळ्याला नगर उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, नगरसेवक बाळू योगेवार, प्रफुल चोरे, रवी ढोबळे, स्वीकृत नगरसेवक संजय सल्लेवाड, रोहित वर्मा, नगरसेविका प्रतिनिधी बशीर मेंबर, मुन्ना रहमान, शादुल, इजाज खान, अहमद कुरेशी यांच्यासह नगरपंचायतचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *