विहीर खचल्याने किरणनगरीचा रस्ता बंद; विहीर बुजवण्यापेक्षा दुरुस्तीकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.
नगरपंचायत प्रशासनाच्या धोरणाबाबत रहिवाशांमध्ये नाराजी; नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची विनंती
ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे
शहरातील प्रभाग क्र.तीनमधील किरणनगरी परिसरात एका जुन्या विहिरीचा कठडा खचल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव नगरपंचायतीने हा रस्ता सध्या बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. मात्र, ही विहीर बुजवून रस्ता मोकळा करण्याऐवजी तिची दुरुस्ती करून पाण्याचे स्त्रोत जतन करावेत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
ढाणकी शहरात अनेकदा पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. अशा काळात किरणनगरीतील नागरिक या विहिरीच्या पाण्याचा उपयोग घरगुती वापरासाठी करत होते. आता विहीर खचल्यामुळे पाण्याचा वापर बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने ही विहीर बुजवण्याचा पर्याय न शोधता, तिचे बांधकाम करून पुनरुज्जीवन केल्यास प्रभाग क्रमांक तीनमधील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटू शकते, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
नगरपंचायत प्रशासन जुन्या विहिरींची दुरुस्ती करण्याऐवजी त्या बुजवण्यावर जास्त भर देते, असा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. विहीर बुजवल्यास भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, नगरपंचायतीने केवळ बॅरिकेड्स लावून जबाबदारी झटकू नये, अशी भावना व्यक्त होत आहे.
शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना वासमवार यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून विहिरीची दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यास रस्ताही पूर्ववत होईल आणि नागरिकांना शुद्ध पाण्याचा पर्यायही उपलब्ध होईल
“ही विहीर परिसरासाठी वरदान आहे. ती बुजवणे म्हणजे पाण्याचा स्त्रोत नष्ट करणे होय. प्रशासनाने तांत्रिक अडचण दूर करून विहिरीचा कायापालट कराव




