ताज्या घडामोडी

स्व. गुलाबसिंग ठाकूर यांना स्मृतिदिनानिमित्त वारकरी संप्रदाय व विद्यार्थ्यांकडून अभिवादन

स्व. गुलाबसिंग ठाकूर यांना स्मृतिदिनानिमित्त वारकरी संप्रदाय व विद्यार्थ्यांकडून अभिवादन

 

 

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबसिंगजी ठाकूर यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने वारकरी संप्रदायाने स्वर्गीय ठाकूर यांच्या प्रतिमेची भव्य दिंडी काढली होती.

​स्वर्गीय गुलाबसिंग ठाकूर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काढण्यात आलेल्या या फेरीत वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी या फेरीत सहभाग घेऊन शिस्तबद्ध संचलन केले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “विठ्ठल-विठ्ठल” च्या जयघोषात निघालेली ही फेरी शहराचे मुख्य आकर्षण ठरली.

​फेरीनंतर कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयामध्ये एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण रावते, ढाणकीच्या नगराध्यक्षा अर्चना वासमवार आणि बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

​या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव आनंद शेवाळकर, सहसचिव किशोर ठाकूर, रमण रावते, रमेश पांडे, संभाजी उपेवाड, केशव बिरबलवाड, संभाजी ताटीकुंडलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

​स्वर्गीय गुलाबसिंग ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात घातलेल्या पायाभरणीमुळेच आज परिसरातील हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *