ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गावात बेकामी विहीर,नागरिकांचा प्रशासनाकडे आक्रोश.
प्रतिनिधी – गोपाल एच राठोड
महागाव तालुक्यातील साई (ई) गावात ग्रामपंचायतच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे एक गावातील हिरालाल महाराज मंदिर जवळ ही विहीर बांधण्यात आली असून ती विहीर पूर्णतः बेकामी ठरली आहे.
या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसून कोणत्याही घरगुती कामासाठीही वापरण्याच्या स्थितीत नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.सदर विहिरीमध्ये धार्मिक अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांमुळे या पूर्वी दोन व्यक्तींच्या या विहिरीमध्ये पडून मृत्यू झालं यापुढील लहान मुले गावातील नागरिक
यापुढे किती लोकांची व जनावराचे या विहिरीत पडतील काही सांगता येत नाही परंतु नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीला मागणी केली की ही विहीर बुजून देण्यात यावी परंतु ग्रामपंचायतचे भोंगळ कारभार व मागील डिसेंबर २०२४ पासून प्रशासक लागल्या असून अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे.या विहिरीची पाण्याची गुणवत्ता अधिकच खालावली असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही वीर भोजन देण्यात यावी अशी मागणी थेट ग्रामपंचायत तसेच प्रशासनाकडे केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही विहीर कोणत्याही उपयोगाची नसून गावातील लहान मुले व नागरिक जनावर यांची जीव धोक्यात असून सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला आहे. तसेच विहिरीतील मृत्यू महादेवाला सोडण्यात आलेला नंदी तात्काळ काढून टाकून योग्य निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.




