अखेर ढानकी माहूर बससेवा सुरू! भारत मुक्ती मोर्चा च्या मागणीला यश.
माहुर हे प्राचीन ऐतिहासिक स्थळ असुन साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे पवित्र स्थान आहे.तसेच तेथे विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळे असून येथे जाण्यासाठी ढानकी आणि परिसरातील 50 ते 60 गावांतील भाविक प्रवाशांना उमरखेड मार्गे खाजगी वाहनाने खिशाला आर्थिक भुर्दंड लाऊन प्रवास करावा लागत होता.
ही बाब हेरून भारत मुक्ती मोर्चा ने युवा नेते विद्वानभाऊ केवटे यांच्या नेतृत्वात उमरखेड आगाराला निवेदन दिले होते.
ह्या निवेदनची तात्काळ दखल घेत आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके मॅडम यांनी ही बस आज दिनांक 25/9/2025 रोजी सकाळी दहा वाजता पासून सुरू केली.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने चालक व वाहक यांना शाल श्रीफळ देऊन बस ला पुष्पहारांचे तोरण बांधून सन्मानित केले.
ह्यावेळी उद्घाटन करताना भारत मुक्ती मोर्चा चे मिलिंद चिकाटे, दिलीप कलाले यांच्यासह प्रवासी मंडळाचे सौरभ मिटकरे हे होते.
ह्या बससेवेळे मोठ्याप्रमाणात सर्वत्र भारत मुक्ती मोर्चा व उमरखेड आगार प्रशासन यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.




