ताज्या घडामोडी

नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे.

नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे.

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

ढाणकी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी साठी हमी भाव योजना अंतर्गत सोयाबीन खरेदी केल्या जात आहे. येथे शेतकरी आपला माल आणला असता त्यांचा माल ग्रेडरकडून तपासल्याशिवाय किंवा वजन केल्याशिवाय सरकारी गोदामातून मनमानीपणे परत पाठवला जात आहे. काही प्रकरणांमध्ये, उत्पादन तपासणीशिवाय काही जणांचे माल उतरवत आहे . या प्रकरणाची तपासणी करण्याची व आपला संचालक मंडळ मधील कुठल्याच संचालकाने शासकिय खरेदीवर हस्तसेप करू नये या बद्दल ची सचिव आणि अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरखेड, यांना अवधूतराव गणपतराव चंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य व शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे.

शेतकरी पहिलेच ओला दुष्काळामुळे आपल पीक खरडून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उरलं सुरलं मालाला सरकार कडून हमी भाव योजना अंतर्गत सोयाबीन खरेदी केल्या जात असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी झाला होता. पण नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची अवहेलना होत असल्यामुळे शेतकरी खस्त झाला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *