बंजारा समाजासह आता आदिवासी, मुस्लिम,आणी इतरही समाजासाठी प्रशांत राठोड बनले देवदूत….!
प्रशांत राठोड यांच्या वतीने मेश्राम महाराजांना वॉटरप्रूप ताडपत्री भेट..

दुर्गमभागातील दऱ्याखोऱ्यासह घनदाट जंगलात साद्या झोपडीत राहणाऱ्या गंगाराम मेश्राम महाराजांना प्रशांत भाऊ राठोड यांनी त्यांच्या झोपडीवर दिले टाडपत्रीचे आच्छादन.
श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर
माहूर तालुक्यातील अति दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या श्री दत्त शिखर घाटातून दत्त मांजरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अति दुर्गम भागात डोंगराच्या कुशीत आसलेल्या पौराणिक भगवान मारुती मंदिरा जवळ अनेक वर्षापासून पर्णकुटी टाकून घोर तपश्चर्या करीत असलेले. गंगाराम मेश्राम महाराज यांच्या पर्णकुटीची बिकट अवस्था पाहून प्रशांत भाऊ राठोड यांनी त्यांची दुर्गम ठिकाणी जाऊन भेट घेत त्यांच्या पर्णकुटीला टाडपत्रीचे आच्छादन देऊन,आशीर्वाद घेतल्याने प्रशांत भाऊ राठोड यांचे समाजकार्य बंजारा मुस्लिम समाजासह आदिवासी बांधवांनाही आधारवड वाटत आहे.
श्री दत्त शिखर संस्थान परिसरातील जंगल प्रचंड घनघोर घनदाट असून, या ठिकाणी सर्व प्रकारचे हिंस्त्र प्राणी, सरपटणारे प्राणी, आढळून येतात. या ठिकाणी पौराणिक श्री मारुती मंदिर आहे. या मंदिराची सुरक्षा आणि पूजा व्हावी या हेतूने अनेक वर्षांपूर्वी गंगाराम मेश्राम यांनी मंदिरा शेजारीच पर्णकुटी स्थापन करून भगवंताच्या तपश्चर्येत लिन झाले. खाण्यापिण्याचे भान नाही तर राहण्याचे भान कुठून राहणार..? शेजारच्या दत्त मांजरी शेख फरीद वझरा तसेच येणाऱ्या भावीक भक्तांनी त्यांना एक साधी तुराट्या लाकडे सागाच्या पानांची एक पर्णकुटी बनवून दिली.यातच ते राहून ऊन,पाऊस,थंडीसह वादळं वाऱ्याची तमा न बाळगता घनघोर तपश्चर्या करीत असतात.
त्यांच्या पर्णकुटीची अवस्था पाहून मौजे दत्त मांजरी येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत भाऊ राठोड यांच्या कानी ही वार्ता घालताच, त्यांनी कुठलाही विलंब न करता, खाण्यापिण्यासह इतर ही सर्व साहित्य घेऊन घनदाट जंगलात पायी प्रवास करून पोहोचले. गंगाराम मेश्राम महाराजांनी सदरील साहित्य पाहून फक्त त्यातून पर्णकुटीवर पावसाचा त्रास होऊण पूजा विधी आणि तपश्चर्यात विघ्न येऊ नये, म्हणून फक्त ताडपत्रीच घेऊन,प्रशांत राठोड यांचे साधूसंताच्या भाषेत आभार मानले.माझ्या या बिकट आवस्थेची दखल घेऊन, तात्काळ येथे मदतीसाठी पोहोचल्याने, “यशस्वीभव” असे भरभरून आशीर्वाद दिले. प्रशांत राठोड यांचे समाजकार्य मोठ्या प्रमाणात असल्याने बंजारा समाजासह, मुस्लीम समाजातही,अनेक लग्नकार्य सामाजिक कार्यात त्यांनी हातभार लावला असून, आदिवासी समाजातही गोरगरीब मुला मुलींचे लग्न लावून देणे, यासह इतर समाजकार्यात स्वतः सहभागी होऊन आशीर्वाद मिळवत असल्याने, बंजारा समाजासह मुस्लिम समाज आणि आता आदिवासी समाजातील ही अनेक नागरिकांना ते भविष्यातील आधारवड वाटत आहेत.
यावेळी श्री दत्त शिखर संस्थांचे संस्थानचे दिवाणजी सुजय भारती, नरसिंग नायक, साहेबराव वाघमारे, दयाळू जाधव, संगेवार मामा, बंडू चव्हाण, गणेश राठोड, दिनेश पवार, प्रदीप पवार, राजू पवार, बंडू भाऊ राठोड, यांचे सह प्रशांत भाऊ मित्र मंडळ, आणि सेवा संकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यामुळे श्रीक्षेत्र माहूर गडावरील सर्व साधूसंतासह भाविक भक्तांतून प्रशांत राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावं होत आहे.




