राजकारण

माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !

माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !

 

प्रतिनिधी महागाव: पुसद / गोपाल एच. राठोड

 

महागाव : महागाव तालुक्यातील वागद इजारा येतील असलेले व काळी दौ जिल्हा परिषद सर्कलचे माजी जि प सदस्य अशोक गोबरा जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकासात्मक कामे जिल्हा परिषद सर्कलमध्ये केली आहे या कामासाठी अनेक जण येत असतात झटपट काम करून देण्याची तयारी असलेले माजी जि प सदस्य अशोक गोबरा जाधव परिसरात यांच्याकडे हे काळी दौ जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार.गटाकडून.लढण्याकरिता सज्ज झाले आहे. पुसद विधानसभा क्षेत्रात महागाव तालुक्यातील काळी दौ जिल्हा परिषद सर्कल समाविष्ट आहे मागील झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार मनोहर नाईक यांनी काळी सर्कल मधून.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषद ची उमेदवारी वागद इजारा येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशोक जाधव यांना दिली होती ते या सर्कल मधून मोठ्या मताधिक्याने विजय देखील झाले होते त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद सर्कल मधील सिमेंट रस्ते नाली सभागृहं तांडा वस्तीतील व दलित वस्तीतील रस्ते सह पाणीपुरवठा योजना विहीर अधिग्रहण सिंचन विहीर या कामासाठी त्यांनी जिल्हा परिषद च्या सेस फंडातून मोठा निधी उपलब्ध करून दिला होता तर दलित आदिवासी समाजा तला अनेक शासकीय योजना मिळवून दिल्या.

होत्या त्यांच्या कार्यकाळातील अनेक कामे आजही चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे वागद इजारा परिसरात जनतेचे काम करणारा एकमेव सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे काही महिन्यात येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकी मध्ये काळी जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण पुरुषासाठी साठी सुटल्यास जाधव यांनी निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे या सर्कलमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक असल्याचे बोलल्या जात आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *