महागांव-शेतात साडेआठ फूट लांबीचा जिवंत अजगर पकडला
सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांची भीती दूर.
महागांव प्रतिनिधी:
महागाव तालुका | पिंपरी शिवार
शेतकरी नेते जगदीश नरवाडे यांच्या शेतात आज सकाळी तब्बल साडेआठ फूट लांबीचा व अंदाजे २० किलो वजनाचा जिवंत अजगर (आर) आढळून आला.ग्रामस्थांची भीती – शेतात खळबळ अचानक जिवंत अजगर दिसल्याने ग्रामस्थांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. काही काळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते.
सर्पमित्रांची धाव – अजगर सुरक्षित पकडला सर्पमित्र गजानन येरवाळ, करण येरवाळ, मंगेश येरवाळ, कृष्णा भेलके, आकाश चव्हाण, चेतन चौरे व पांडु राठोड चंदन सर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला पकडून वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडले.वनविभागाचा सल्ला – घाबरू नका वनविभागाने अधिकारी डी के मुनेश्वर यांनी, “अजगर हे निरुपद्रवी साप आहेत. ते प्रामुख्याने उंदीर, ससे व लहान प्राणी खातात. मनुष्याला धोका नसतो. अशा वेळी ग्रामस्थांनी घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.कौतुकाचा वर्षाव ग्रामस्थांनी सर्पमित्रांच्या शौर्याचे व तत्परतेचे मनापासून कौतुक केले.




