ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना रोजगाराची सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा – मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे आव्हान….!

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना रोजगाराची सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा – मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे आव्हान….!

माहूर नांदेड़/जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर

 

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. येथे आयोजित दिनांक. 30. सप्टेंबर. रोजी.मेगा जॉब फेअर.बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा – कुलगुरू डॉ.मोहन चासकर असे साहेबांनी कळवले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर आणि प्रा – कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांच्या पुढाकारातून मेगा जॉब फेअर – 2025 चे आयोजन गुरुवार, दिनांक. 30 ऑगस्ट 2025.रोजी सकाळी 9 वाजता विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे.या मेगा जॉब फेअर मध्ये अमेझॉन, आर एस सॉफ्टवेअर, नेटविन इन्फ्रासोल्युशन, टीम लीस डिजिटल, क्यूस्टर क्रोप,

पॉईंटमॅट्रिक्स जेबीएल,गोदरेज, विनजीट टेक्नॉलॉजीस यासारख्या नामांकित कंपन्यासह अनेक उद्योग सहभागी होणार आहेत.या सुवर्णसंधीचा फायदा सुशिक्षित बेरोजगार युवक युती नी घ्यावा असे आव्हान विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी केला आहे.

डिप्लोमा, पदवीधर व पदव्युत्तर अशा सर्व स्तरावरील उमेदवारांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत.

जॉब फेअर मध्ये सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी https://bit.ly/NANDEDEDJF या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे .

 

त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन प्रत्यक्ष मुलाखती पार पडणार आहेत.

 

निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्यानंतर जाहीर केली जाणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा शैक्षणिक कागदपत्रे व ओळखपत्र घेऊन उपस्थित राहावे.

 

या मेगा जॉब फेअर मुळे परिसरातील तरुणांना नामांकित कंपनीमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

 

अधिक माहितीसाठी डॉ.शशिकांत ढवळे औषध निर्माण शास्त्रज्ञ संकुल संपर्क. (997070 0030) डॉ.के. चैतन्य रसायनशास्त्र संकुल संपर्क. (7385721804) डॉ.राजकुमार सून औषध निर्माण शास्त्र संकुल संपर्क. (9822237545) डॉ. अर्चना साबळे संगणक शास्त्र संकुल संपर्क. (9765667793) आणि डॉ. योगेश लोलगे

भूशास्त्र संकुल संपर्क. (9552545248) यांच्याशी संपर्क साधावा असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *