महागाव (सोईट) शेत शिवारात बिबट्याने केले गाय आणि वासरूची शिकार
उमरखेड प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:
बिबट्याने गाय आणि वासरू याची शिकार केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील महागाव (सोईट) येथील शेतात 25 जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, महागाव (सोईट) येथील संजय जळबा वाठोरे यांच्या शेतशिवारात 24 जूनला ते दररोज प्रमाणे आपल्या शेतात दुसऱ्या गोठ्यात रात्री बारा वाजेपर्यंत थांबून घरी आले होते नंतर सकाळी शेतात गेले असता त्यांना आपली गाय आणि वासरूची हिस्त्र प्राण्याने शिकार करून ठार केल्याचे दिसले.त्यांनी वनविभागाला फोन लावले असता वनविभाग अधिकारी घटना स्थळावर येऊन पंचनामा केल्यावर त्यांनी सांगितले की गाय आणि वासराची शिकार बिबटयाने केली आहे. त्यानंतर संजय जळबा वाठोरे यांनी वनविभागाकडे तक्रार दाखल केली असून पुढील तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले आहे.या घटने मुळे येथील शेतकरी दहशतीचत असून या परिसरातील कृष्णापूर व महागाव (सोईट )भागात अनेकवेळा बिबट्या ने गाय, बैल व शेळ्यांचा शिकार केला आहे. या घटना वारंवार घडत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.




