ताज्या घडामोडी

लहुजी क्रांती मोर्चा सिंदगी द्वारे अण्णाभाऊ साठें जयंती साजरी.

लहुजी क्रांती मोर्चा सिंदगी द्वारे अण्णाभाऊ साठें जयंती साजरी.

 

यवतमाळ: उमरखेड

प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.

 

उमरखेड तालुक्यातील शिंदगी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.

या कार्यक्रमाकरिता या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चाचे पुंडलिक तलवारे हे होते.

“मातंग समाजाचा उद्धार हा शिव फुले,लहू,शाहू, आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांच्याच विचाराने होऊ शकतो.” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 

तर प्रमुख उपस्थिती म्हणून लहुजी क्रांती मोर्चाचे संजयभाऊ बनसोडे, तथा शुभम खंदारे, गजानन खानजोडे हे होते.

ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना दिलीप कलाले लहुजी क्रांती मोर्चा तालुकाध्यक्ष यांनी केली.विशेष उपस्थिती म्हणून अतुल काळे,ओंकार वंजारे हे उपस्थित होते.

यावेळी लहुजी क्रांती मोर्चा द्वारे मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांचे तैलचित्र अनावरण करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तम सुरोशे,राजश्रीबाई जळके, धुरपताबाई वांगे,पांडुरंग वांगे, सुमेध शिरडकर, कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन चांदराव तासके यांनी तर आभार आयोजकांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता येथील शाखा अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा परमेश्वर जांभळे,दत्ता वांगे,यांसह लहुजी क्रांती मोर्चा उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *