ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा शाळा भरो आंदोलन करु.भारतीय विद्यार्थी मोर्चा चा इशारा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा शाळा भरो आंदोलन करु.भारतीय विद्यार्थी मोर्चा चा इशारा

प्रतिनिधी मिलिंद ची काटे

पुसद तालुक्यातील फेट्रा, मोप, होरकड, शिवणी या गावांना जोडणारा रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी बंद असल्यामुळे गाव खेड्यातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मौलिक अधिकारा पासून मुकावे लागत आहे.

सदर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येत असून प्रशासनाच्या दिरंगाई मुळे विद्यार्थ्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

यासंदर्भात भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी दोन दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास कार्यालयाच्या आवारामध्ये शाळा भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष जयशील कांबळे यांनी दिला.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *