कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित कारवाई करण्याची मागणी.
ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकटे
2024 वर्षातील अतिवृष्टी नुकसान भरपाईचा शासन निर्णय हा दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला काढण्यात आला होता.फेब्रुवारी 2024 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा समावेश आहे.ज्यामध्ये यवतमाळ जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत.यात यवतमाळ व बुलढाणा जिल्हासाठी हा शासन निर्णय काढण्यात आला होता.या 2 जिल्ह्यासाठी रुपये पाच कोटी बावीस लक्ष तेरा हजार ( 522.13) इतके अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. पण या अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून उमरखेड तालुक्यातील कृषी सहाय्यक यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे.
सविस्तर माहिती अशी की,मौजे सोईट शिवरातील शेतकरी दत्तात्रेय लक्ष्मण फुलकोंडवार यांनी शेतजमीन सन 2024-2025 च्या खरीपासाठी कापूस व सोयाबीन या पिकांची पेरणी केली होती. शेती माहे 31 ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.त्यानंतर कृषीसहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापनाने पथकाने त्यांच्या व इतर शेतात येवून सुध्दा पाहणी केली. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. त्यानंतर व्हि. के. नंबर काढण्याकरीता कृषी सहाय्यक यांना त्यांनी आधार कार्ड, 7/12, बैंक पासबुक दिले तरी कृषी सहाय्यक याने व्हि. के. नंबर काढतेवेळेस आधार कार्ड नंबर चुकीचा टाकला . जेंव्हा शेतकरी दत्तात्रेय लक्ष्मण फुलकोंडवार यांनी कृषी सहाय्यकाला अनुदाना बद्दल विचारले असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, तुमचा व्हि. के. नंबर अद्याप प्राप्त झाला नाही तुमचा आधारकार्ड नंबर दुरुस्त करुन पुन्हा तुमचा व्हि. के. नंबर काडुन देतो.पण जेंव्हा शेतकरी आपला व्हि. के. नंबर साठी वारंवार चकरा मारून सुद्धा कृषी सहाय्यक याने त्यांना उडवाउडवीचे उत्तर देत जाणूनबुजुन अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवले आहे म्हणत त्यांनी साहाय्यक जिल्हा अधिकारी ऊमरखेड, तहसीलदार उमरखेड यांच्याकडे निवेदन देत अतिवृष्टीचे अनुदान लवकरात लवकर प्राप्त करुन दयावे व चौकशी करुन दोषीवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा,लोकशाही मार्गाने उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.माझ्या शेतातील कापूस व सोयाबीन या पिकाचे खुप प्रमाने नुकसान झाले होते कृषीसहाय्यक वाघमारे यांनी माझ्य आधार नबरं चुकीचे टाकून मला VK नंबर प्राप्त करुन दिल्य नाही मला जाणीव पूर्वक अनुदान पासून वंचित ठेवले याला सर्वस्वी जवाबदार कृषीसहाय्यक आहे.




